आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल

Foto

जालना- एका समाजाबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार्‍याविरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल आगळे (रा. शंकरनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियाचा वापर करुन विशालने एका समाजाबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल केला. १५ सेकंदाच्या या व्हिडिओमुळे त्याने एका समाजाच्या भावना दुखावल्या. यावरून शुक्रवारी (ता.२३) रात्री शंभर ते दीडशे जणांचा जमाव कदीम पोलिस ठाण्यासमोर जमा झाला होता. पोलिस अधीक्षक यशवंत जाधव, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, संजय लोहकरे यांनी जमावाला शांत केले.  

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker